आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझी सासू खाष्ट, तिच्याकडे बक्कळ पैसा, छापा टाका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - सासू-सुनाच्या टीव्ही मालिकांमधील संघर्षात आता आयकर विभागालाही उडी घ्यावी लागली आहे. आयकर अधिकाऱ्यांकडे अशा प्रकारचे एक प्रकरण उजेडात आले आहे. त्यात सुनेने सासूच्या विरोधात तक्रार केली. सासूबाई पैसेवाल्या आहेत. घरी येऊन चौकशी करा, अशी विनंती सुनेने केली आहे.

शहरातील सिटीलाइट भागात राहणाऱ्या एका महिलेने सासूच्या आर्थिक व्यवहाराची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर सूनबाई पत्रासह आयकर कार्यालयात दाखल झाली होती. सासूने कोणत्या तिजोरीत किती पैसे ठेवले आहेत.

कोणकोणत्या बँकेत सासूबाईंचे खाती आहेत याचा सविस्तर तपशीलही सुनेने आयकर खात्याला पाठवलेल्या पत्रातून दिला आहे. एवढेच नव्हे तर सासूबाई किती खाष्ट आहेत हेदेखील सून पत्रातून सांगायला विसरलेली नाही. सासू दबंग आहे. तिने अनेकदा त्रास दिला, असेही त्यांनी तोंडी सांगितले. हे ऐकून अधिकारीही चकित झाले.

अनेक लोक शेजाऱ्यावरील खुन्नस काढण्यासाठीदेखील अशा प्रकारची तक्रार करतात. कोणी बंगला खरेदी केला, कोणी परदेश दौरा केला किंवा एखादी महागडी गाडी खरेदी केल्यानंतरही अनेकांनी आयकर खात्याकडे तक्रार केल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
बातम्या आणखी आहेत...