आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या 6 महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबून घेतला जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- 6 महिन्याच्या मुलीची हत्या करणारी आई जल्पा आणि तिचा माजी प्रियकर)
राजकोट (गुजरात)- राजकोट येथे दिवाळीदरम्यान घडलेली एक घटना अनेक दिवस माध्यमांमध्ये चर्चेत होती. एका महिलेच्या लहान मुलीला दोन साधूंनी घरातून पळवले होते. त्या महिलेला याची जाणीव होताच तिने कॉलनीतल्या लोकांना सांगितले. सर्वांनी त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली.
मात्र, त्या मुलीचा किंवा त्या साधूंना थांगपत्ता लागला नाही. लागणार तरी कसा? कारण या घटनेमागे वेगळीच कहानी दडलेली होती. हमसून हमसून रडणा-या त्या आईनेच आपल्या निरागस चिमुकलीला संपण्यासाठी प्रियकराच्या हातात सोपवले होते.
राजकोटच्या नंदनवन सोसायटीत घडलेल्या या घटनेवर पोलिसांपासून रजकिय नेत्यांपर्यंत दबाव होता. प्रत्येक ठिकाणी चिमुकलीचा शोध घेतला जात होता. परंतु एक महिना उलटून गेला तरी या घटनेचा काहीच तपास लागला नाही. अखेर पोलिसांना उलट्या पध्दतीने तपास घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे हाती लागत गेले. पोलिसांनी त्या चिमुकलीच्या आईची कसून चौकशी केल्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले, की धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या मुलीला जीवे मारण्यासाठी प्रियकराच्या हाती सोपवले होते. तिचा गळा दाबून मारल्यानंतर मृतदेह कॅनलमध्ये फेकून दिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या काय आहे संपूर्ण घटना...