आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Of Surat Return Land To Gujarati Businessman Laljibhai Patel

मोदींचा सूट खरेदी करणार्‍या हीरे व्यापार्‍यावर सरकार मेहेरबान, 54 कोटींचा भूखंड केला परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वादग्रस्त सूट लिलावात खरेदी करणारे हीरे व्यापारी लालजीभाई पटेल यांना सूरत महानगर पालिकेने 54 कोटींचा फायदा करुन दिला आहे. सूरत महानगर पालिकेवर आरोप आहे, की नगर नियोजन खात्याने अधिग्रहित केलेला भूखंड हीरे व्यापाऱ्याला परत करण्यात आला आहे. या भूखंडाची किंमत 54 कोटी रुपये आहे. यामुळे विरोधकांनी आरोप केला आहे, की धर्मानंदन डायमंडच्या लालजीभाईंनी मोदींचा सूट 4.31 कोटीत खरेदी करुन 54 कोटींचा फायदा करुन घेतला.
धर्मानंदन डायमंडसच्या स्पोर्ट्स कॉम्पलेक्सच्या मालकिचे शहरात 23 भूखंड आहेत. स्पोर्ट्स कॉम्पलेक्सला लागून असलेला एक भूखंड सूरत मनपाने सामाजिक उद्देशासाठी राखीव ठेवला होता. हीरे व्यापाऱ्याला भविष्यात फायदा व्हावा या उद्देशानेच या भूखंडाचे आरक्षण करण्यात आले होते. त्यामुळेच आता धर्मानंदन स्पोर्ट्सला भूखंड परत करण्यात आला आहे. त्याचा उपयोग क्रीडाक्षेत्रासाठी होत असल्याने भूखंड दिला असल्याचा दावा मनपा अधिकाऱ्यांनी केला आहे.
अधिकारी म्हणाले...
लालजीभाईंच्या कंपनीने मनपाने अधिग्रहित केलेला भूखंड परत मिळण्याची मागणी केली होती. त्याच्या आसपास त्यांचेच इतर भूखंड आहेत. त्यामुळे मनपाने त्यांना भूखंड परत केला आहे. त्याचा उपयोग ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारणीसाठी करणार आहेत. त्यामुळे भूखंड परत करण्यात आला आहे.
जीवन पटेल, उपायुक्त, नगर नियोजन विभाग

दहा लाखांच्या सूटवरुन विरोधकांनी साधला होता निशाणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या वर्षी जानेवारीमध्ये भारत दौऱ्यावर आले होते. 25 जानेवारी रोजी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी मोदींनी जो सूट परिधान केला होता त्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. मोदींनी परिधान केलेल्या सूटवर सोन्याच्या तारांनी इंग्रजीमध्ये नरेंद्र दामोदरदास मोदी लिहिलेले होते. या सूटची किंमत 10 लाख रुपये असल्याची चर्चा होती.

मोदींनी एक दिवस वापरलेल्या या सूटचा लिलाव करण्यात आला आणि त्यातून आलेले 4.31 कोटी रुपये गंगा स्वच्छता अभियानासाठी देण्यात आले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सूट संबंधीत फोटो