आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Murder Thriller: मित्राचा खुन केल्यावर करणारा होता प्रेयसीची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत (गुजरात)- वकील अमित सिंधा याच्या खुनाचे प्रकरण दिवसेंदिवस आणखी गुंतागुंतीचे होत आहे. या खुनामागे काय उद्देश आहे आणि खुनाचा आरोप असलेला दिव्येश खिखलीगर कुठे आहे, याची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, मित्राचा खुन केल्यावर दिव्येशला प्रेयसीची हत्या करायची होती, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे.
दिव्येशची प्रेयसी भूमिका हिने पोलिसांना सांगितले, की अमित सिंधाचा खुन केल्यावर दिव्येशने मला तीन वेळा फोन केला होता. यावेळी आमच्यात बोलणे झाले. त्याने मला भेटायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर मी शरणागती पत्करेल असेही त्याने सांगितले होते. पण तो फरार झाला.
दरम्यान, त्याने भूमिकाच्या घरी शिरण्याचा प्रयत्न केला. बाल्कनीतून त्याने घरी घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण भूमिकाच्या हे लक्षात आले. तिने लगेच आरडा ओरडा केला. त्यानंतर शेजारी धावून आले. तो पळून गेला. तो पळाला नसता तर भूमिकाचाही जीव त्याने घेतला असता.
काय आहे प्रकरण
अमित सिंधा व्यवसायाने वकील आहे. सुरत शहर भाजप युवा मोर्चाचा माजी प्रमुख आणि वीर नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापिठाचा तो सिंडिकेट सदस्य होता. त्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह नवसारी हायवेच्या बाजूला सापडला होता.
पुढील स्लाईडवर बघा, पोलिसांना माहिती देताना दिव्येश खिखलीगरची प्रेयसी भूमिका...