आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Muslim Spiritual Leader Gave 5.5 Bigha Land For Shiv Temple In Gujarat, Hindu Preacher Funded For Haj

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातमध्ये मुस्लिम धर्मगुरुने शिवमंदिरासाठी दान केली वडिलोपार्जित जमीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातच्या दोन धार्मिक नेत्यांनी जातीय सलोख्याचा एक आदर्श निर्माण केला आहे. प्रसिद्ध रामकथाकार मुरारी बापू यांनी एका कुल्फी विक्रेत्याला हज यात्रेला जाण्यासाठी पैशांची मदत केली आहे. तर, सैय्यद मेंहदी या मुस्लिम धर्मगुरुने शिवमंदिरासाठी स्वतःच्या मालकीची 5 बिघा जमीन दान दिली आहे.
भक्तांच्या सोयीसाठी दिली जमीन
भावनगर मधील रतौल गावातील जमीनदार आणि मुस्लिम धर्मगुरु सैय्यद मेंहदी यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमीनीतील साडेपाच बिघा जमीन गावातील शिवमंदिरासाठी दान दिली. यावेळी मेंहदी म्हणाले, 'शिवमंदिराच्या विस्तारासाठी ही जमीन दिली आहे. यामुळे येथे मोठ्या संख्येने येणार्‍या भक्तांना अडचण होणार नाही. मी जेव्हा जमीनीची कागदपत्रे मंदिराच्या विश्वस्तांना सौपवली तेव्हा मुरारी बापू यांना देखील निमंत्रित केले होते.'
'पैशांपेक्षा महत्त्वाची हज यात्रा'
मुरारी बापू 79 वर्षीय युनूसभाई मलिक यांना नत्थाभाई या नावाने लहानपणापासून ओळखतात. मलिक भावनगरमधील तलगजरदा गावात कुल्फी विकण्याचे काम करतात. त्यावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मलिक यांनी सांगितले, की एक दिवस मुरारी बापूंनी विचारले हज यात्रा केली का? त्यावर मी त्यांना सांगितले, मी एक गरीब माणूस आहे. हजला जाण्याचा खर्च मला परवडणारा नाही. मलिक यांच्या म्हणण्या नुसार, त्यावर मुरारी बापूंनी, चिंता करण्याची गरज नाही, तुम्ही हजची तयारी सुरु करा, असे म्हटले. त्यानंतर त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला हजला जाण्यासाठी 6 लाख 20 हजार रुपये दिले, आणि 'मी पैसे दिले हे महत्त्वाचे नाही, तर हजला जाणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले.'