आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mythological Mountain Mandranchal Found In Gujarat

गुजरातमध्ये आढळला समुद्र मंथनातील पर्वत; शिवशंकराने इथे केले होते विषप्राशन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- सुरत जिल्ह्यातील पिंजरात गावाजवळीत समुद्रात पुरातत्त्व विभाग (आर्कियोलॉजी डिपार्टमेंट) आणि समुद्रविज्ञानशास्त्र विभागाने (ओशनोलॉजी डिपार्टमेंट) एक पर्वत शोधून काढला आहे. मंदार पर्वतासारखा हा पर्वत दिसत‍ असून समुद्र मंथनात हाच पर्वत वापरल्याचा अंदाजही वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे भगवान शिवाने इथे विषप्राशन केले होते. या पर्वताच्या मध्यभागी एक नागाकृतीही आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ओशनोलॉजी डिपार्टमेंटने आपल्या वेबसाइटवर या पर्वतासंबंधित माहितीची एक लिंक अपलोड केली आहे. तसेच अधिकार्‍यांनी पुढील तपास सुरु केला आहे.
बिहार आणि गुजरातमध्ये मिळालेला पर्वत एकच...
बिहारमधील भागलपूरजवळ मंदराचल पर्वत असून गुजरातमधील समुद्रात आढळलेला पर्वत एकाच प्रकारचा असल्याचे आर्कियोलॉजी आणि ओशनोलॉजी विभागाच्या अधिकार्‍यांचा अंदाज आहे.
आर्कियोलॉजिस्ट मितुल त्रिवेदी यांच्या मते, बिहार आणि गुजरातमध्ये आढळलेला पर्वतामध्ये खूप साम्य आहे. पर्वत ग्रेनाइट दगडापासून तयार झाला आहे. तसे पाहिले तर ग्रेनाइट दगडाचे पर्वत समुद्रात आढळत नाहीत. त्यामुळे गुजरातमधील समुद्रात आढळलेला पर्वत आता एक संशोधनाचा विषय बनला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मंदार पर्वताबाबत महत्तपूर्ण माहिती...