आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुलीच नाही तर, निसंतान सुंदर महिलांनाही शिकार बनवायचा नारायण साई'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - बलात्काराचा आरोपी नारायण साईच्या शोधात पोलिस देशभर छापेमारी करत आहे. नारायणसाईची मुख्य सेविका गंगाला उदयपूर पोलिसांनी 8 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. नारायण साईला मुली पुरवण्याचा गंगावर आरोप आहे. नारायण साईवर आरोप झाल्यानंतर गेल्या महिन्यापासून गंगाही फरार होती. गेल्या काही वर्षांपासून ती त्यांची अत्यंत जवळची सेविका मानली जाते.
गंगाची अटक हे पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. कारण ती नारायण साईची अत्यंत जवळची आहे. तिच्या अटकेनंतर नारायण साईचाही पत्ता लागेल असा विश्वास पोलिसांना आहे.
गंगाच्या अटकेनंतर नारायण साईसंदर्भात आणखी एक खुलासा झाला आहे. नारायण साई प्रामुख्याने निसंतान महिलांना आपली शिकार करत होता, असे त्याचा अंगरक्षक राहिलेल्या देवेंद्र याने सांगितले आहे.