आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नारायण साईची तुरुंगातून सुटका, गुजरात उच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाजपोर तुरुंगातून बाहेर येताना नारायण साई - Divya Marathi
लाजपोर तुरुंगातून बाहेर येताना नारायण साई
सूरत - मुलीवरील अत्याचार प्रकरणी 17 महिने सूरतच्या तुरुंगात कैद असलेल्या आसारामचा मुलगा नारायण साईला मंगळवारी(ता.26) सोडण्‍यात आले. गुजरात उच्च न्यायालयाने सोमवारी साईला आपल्या आईच्या तब्येत बरी नसल्याने तीन आठवड्यांकरिता जामीन मंजूर केले होते. मंगळवारी तुरुंगातून बाहेर निघताना त्याने उपस्थित लोकांना अभिवादन केले. जामीनावर सुटला असला, तरी साईवर पोलिसांच्या पाहणी खाली असेल. न्यायालयाने सांगितले, की जर चार दिवसात त्याच्या आईचे ऑपरेशन होत नसेल, तर त्याला जामीनाच्या चौथ्‍या दिवशी आत्मसमर्पण करावे लागेल.
डिसेंबर 2013 पासून तुरुंगात कैद
आरोपी साईवर दोन बहिणींनी बलात्काराचा आरोप केल्याप्रकरणी डिसेंबर 2013 पासून तुरुंगात कैद करण्‍यात आले आहे. त्या दोन बहिणींनी साई आणि आसारामविरुध्‍द बलात्काराच्या दोन वेगवेगळे तक्रारी पोलिस ठाण्‍यात केल्या होत्या. नारायण साईविरुध्‍द भारतीय दंड संहिता कायद्यानुसार बलात्कार, अनैसर्गिक संबंध, ओलिस ठेवणे, बेकायदेशीर जमा होणे, घातक शस्त्रास्त्रांनी दंगा घडवून आणणे, धमकी आणि कट करणे यासारखे गुन्हे नोंदवण्‍यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...