सुरत - नवरात्रींच्या जल्लोषाला सुरवात झाली आहे. नवरात्रीचा सण तसा शक्तीच्या अराधनेचा आहे, मात्र त्यासोबतच एक्सायटिंग नृत्य गरबाही त्यासोबत जोडला गेला आहे. गरबा गुजरातचे लोकनृत्य आहे. त्याची तयारी गुजरातमध्ये महिनाभर आधीपासून होते. गरबा प्रॅक्टिससोबतच तरुणी नवरात्रीत वेगळेपण दिसण्यासाठी नव्या नव्या क्लृप्त्या शोधत असतात.
काही वर्षांपासून गरब्यामध्ये टॅटूची मोठी चलती आहे. सध्या तर टॅटू हा तरुणांसाठी स्टाइल सिम्बॉल झाला आहे. नवरात्रीमध्ये तरुणी
आपल्या शरीरावर विविध डिझाइन्सचे कलरफुल टॅटू बनवून घेतात.
गुजरातमध्ये मोदींचे टॅटू काढण्याची तरुणींमध्ये क्रेझ आहे. यंदा मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांच्या बद्दलचे आकर्षण अधिक वाढले आहे. नवरात्रीच्या प्रारंभीच मोदी अमेरिका दौर्यावर गेले आहेत. तिथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे तरुणींनी मोदी आणि ओबामांचे टॅटू बनवून घेतले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, तरुणींमध्ये मोदी फिव्हर (सर्व छायाचित्र दिव्य भास्कर)