आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: 15 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात साकार झाले नरेंद्र मोदींचे स्वप्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात रोमा स्ट्रिटवरील पार्कलँड येथे महात्मा गांधींच्या पुर्णाकृती पुतळ्याचे रविवारी अनावरण केले. यावेळी ब्रिस्बेनचे गव्हर्नर आणि महापौर यांच्यासह भारतीय वंशाचे 150 हून अधिक नागरिक उपस्थित होते. जवळपास 30 मिनिटे चाललेल्या या समारोहात नरेंद्र मोदी यांनी हिंदीतून भाषण केले, दुभाषिक महिला ते इंग्रजीतून सांगत होत्या.
मोदी भाजपचे प्रचारक होते, तेव्हा ऑस्ट्रेलियाला आले होते. त्यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियात महात्मा गांधीचा पुतळा उभा राहिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे कार्यक्रमाचे संयोजक हेमंत नाईक यांनी सांगितले. हा धागा पकडत मोदी म्हणाले, माझ्यावर विरोधक आरोप करतात की, पंतप्रधान झाल्यानंतर मी गांधींवर जास्त बोलत आहे. मात्र, हेमंतभाईंनी त्यांच्या प्रस्तावनेतून विरोधकांना उत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींचा पुतळा उभारण्यात मुळचे अहमदाबादचे असलेले आर्किटेक्ट हेमंत नाईक यांचा महत्त्वाचा वाटा आहे, हे अनेकांना माहित नाही. 'दिव्य मराठी नेटवर्क'ने त्यांची एक्स्लूझिव्ह मुलाखत घेतली त्यात हेंमत नाईक यांनी 15 वर्षांपूर्वीची ही कहानी उजेडात आणली आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाले हेमंत नाईक