आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अहमदाबाद-ऐतिहासिक परंपरा लाभेलेल्या जगन्नाथ रथयात्रेला अहमदाबादमध्ये सुरुवात झाली आहे. रथयात्रेचे हे 136 वे वर्ष आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः रथ ओढून यात्रेला सुरुवात केली. मोदींनी भल्या पहाटे जमालपुरा येथील मंदिरात हजेरी लावली. त्यांनी विधीवत पुजा करुन भगवान जगन्नाथ यांचा रथ ओढला. त्यानंतर गुजरातच्या जनतेपुढेही नतमस्तक होऊन मोदींनी आशीर्वाद घेतला.
अहमदाबादच्या जमालपुरा भागातील प्राचीन मंदिरात श्रीकृष्णाचे जगन्नाथाच्या स्वरुपातील मुर्ती स्थापित आहे. अहमदाबादव्यतिरिक्त गुजरातमध्ये 125 लहानमोठ्या स्वरुपाच्या रथयात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात येतात. अहमदाबाद येथून रथयात्रा शहराच्या पूर्वेकडील सरसपूर येथे जाते. येथे भगवन जगन्नाथांचे आजोळ आहे. तेथून जगन्नाथ, बहिण सुभद्रा आणि भाऊ बलराम सोबत परत येतात. शहराच्या विविध भागातून रथयात्रा मार्गक्रमण करते.
1878 पासून सुरु आहे रथयात्रा
रथयात्रेला 1878मध्ये सुरुवात करण्यात आली होती. जमालपु-यातील मंदिराच्या ठिकाणी 446 हनुमानाचे मंदिर आणि एक आश्रम होता. महामंडलेश्वर महंत नरसिंहदासजी महाराज यांनी जगन्नाथांचे मंदिर उभारले. त्याचवर्षीपासून रथयात्रा सुरु करण्यात आली. रथयात्रा पूर्व अहमदाबादच्या अतिसंवेदनशील भागातूनही जाते. यापुर्वी याभागत तणाव निर्माण झालेला आहे. रथयात्रेदरम्यान 1946, 1969, 1985, 1986 आणि 1992 मध्ये दंगलीही भडकल्या होतया. तरीही रथयात्रा काढण्यात आली होती. 1992 नंतर कोणतीही अप्रिय परिस्थिती निर्माण झालेली नाही. प्रत्येक धर्मातील नागरिक रथयात्रेचे स्वागत करतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा रथयात्रेची छायाचित्रे...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.