आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या दौ-याला एएसएल सुरक्षा कवच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आता झेड प्लस सुरक्षेसह अ‍ॅडव्हान्स सिक्युरिटी लायसनिंग (एएसएल) सुरक्षा देण्यात आली आहे. ही सुरक्षा व्यवस्था पंतप्रधानांना दिल्या जाणा-या सुरक्षेच्या समकक्ष मानली जाते. मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर दुस-यांदा त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी शनिवारी पाटण्यास भेट दिली. शनिवारपासूनच त्यांना ही सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. केंद्राकडून याबाबत राज्यांना आदेश देण्यात आल्याची माहिती गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. एस. के. नंदा यांनी दिली. एसएसलची टीम मोदी यांचे दौरे आणि गुजरात पोलिसांच्या दरम्यान माहिती संकलन करण्याचे आणि सुरक्षा व्यवस्था देण्याचे काम करेल. मोदींच्या गुजरातबाहेरील दौ-यात त्यांच्यासोबत 46 एनएसजी कमांडोसह 144 जणांचा ताफा असेल. यामध्ये आयपीएस, जीपीएस कॅडरच्या वरिष्ठ अधिका-यांसोबतच बॉम्बनाशक पथकाचाही समावेश राहील.

एएसएलचे काम
नरेंद्र मोदींच्या प्रत्येक कार्यक्रमावेळी संबंधित ठिकाणी सुरक्षा नियमांना अनुसरून तपासणी, निगराणी तसेच सुरक्षा व्यवस्था निश्चित करण्याचे काम एएसएल टीम करेल. स्थानिक पोलिस आणि गुजरात पोलिसांदरम्यान समन्वयाचे कामही तेच बघतील आणि सुरक्षेसंबंधी सर्व निर्णय आपल्या मर्जीनुसार घेतील. संबंधित स्थळाचा मार्ग, ताफा, लोकांची तपासणी, वाहन तपासणी इत्यादी सुरक्षा व्यवस्थेचा आढावासुद्धा त्यांच्याकडेच राहील.