आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका महिन्यात मोदींचा चौथा गुजरात दौरा, राहुल गांधी म्हणाले - जुमल्यांची बरसात होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर - भारतीय जनता पक्षाच्या गौरव महासंमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी गुजरातमध्ये येत आहेत. यावेळी ते भाजपच्या विजय यात्रा रॅलीलाही संबोधित करणार आहेत. गुजरात निवडणूक हा मोदींसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळेच एका महिन्यात हा त्यांचा चौथा गुजरात दौरा आहे. मोदींच्या गुजरात दौऱ्यावर टीका करताना राहुल गांधींनी ट्विट केले, 'हवामानाची स्थिती... निवडणुकीच्या आधी  गुजरातमध्ये होणार जुमल्यांचा बरसात.' 
 
रुपाणी आणि अमित शहाही राहाणार उपस्थित 
- मोदी दुपारी 1 वाजता अहमदाबादला पोहोचतील. येथून ते गांधीनगरमधील भाट या गावी जातील. 
- दुपारी 3 वाजता गौरव यात्राच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहातील. 
- या कार्यक्रमाला जवळपास 7 लाख लोक उपस्थित राहाणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला गुजारतचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा उपस्थित राहाणार आहेत. 
 
मोदींनी केले अनेक ट्विट्स 
- गुजारात दौऱ्यापूर्वी मोदींनी काही ट्विट्स केले. 
- त्यांनी म्हटले, की उद्या गांधीनगरला असणार आहे. येथे गुजरात गौरव महासंमेलनाला उपस्थित राहाणार. या संमेलनाला संपूर्ण गुजरातमधील भाजपचे कार्यकर्ते येणार आहेत. 
 
182 विधानसभा जागा, 149 मतदारसंघातून गेली गौरव यात्रा 
- 1 ऑक्टोबरपासून सुरु झालेली गुजरात गौरव यात्रा 15 दिवसांमध्ये राज्यातील 182 मतदारसंघांपैकी 149 मतदारसंघातून गेली. 
- गौरव यात्रेने 15 दिवसांमध्ये 4471 किलोमीटर प्रवास केला. 
- भाजपचे अनेक केंद्रीय मंत्र्यांसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही या यात्रेत सहभागी झाले होते. 
 
महिन्याभरात चौथ्यांदा मोदी गुजरातला 
- गेल्या एक महिन्यात (साधरणतः 32 दिवसांत) मोदींचा हा चौथा गुजरात दौरा आहे. 
- याआधी 14 सप्टेंबरला त्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेनची कोलनशिला ठेवली होती. 
- त्यानतंर 17 सप्टेंबरला स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मोदी राज्याच्या दौऱ्यावर आले होते. 
- 7 ऑक्टोबरला ते दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते. तेव्हा राजकोट, वडनगर आमि गांधीनगर येथे अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले होते. काही योजनांचे लोकार्पणही मोदींने केले.
- 8 ऑक्टोबरला मोदी त्यांचे गाव वडनगर येथेही गेले होते. याभागात त्यांनी रोड शो केला होता. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींचे ट्विट्स... 
बातम्या आणखी आहेत...