आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्तातील जेनेरिक औषधे लिहून देणे डॉक्टरांना बंधनकारक करणार, लवकरच कायदा: मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत/सिल्व्हासा - स्वस्त उपचारांसाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच याबाबत संकेत दिले आहेत. मोदी म्हणाले, डॉक्टरांनी रुग्णांना स्वस्त जेनेरिक औषधीच लिहून देणे बंधनकारक होईल, असा कायदा केंद्र सरकार आणणार आहे.
 
सुरतमध्ये ५०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे मोदींच्या हस्ते उद््घाटन झाले. त्या वेळी मोदी म्हणाले, लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने स्वस्त औषधांची उपलब्धता आणि अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रणाखाली आणण्यासारखी पावले उचलली आहेत.
 
याच मालिकेत अटलबिहारी सरकारच्या १५ वर्षांनंतर आमच्या सरकारने नवे आरोग्य धोरण आणले आहे. देशात आरोग्य क्षेत्रात डॉक्टरांच्या टंचाईसह अनेक समस्या होत्या. मध्यमवर्गीय कुटुंबातील एक व्यक्तीही आजारी पडली तर अवघ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कोलमडते. घर खरेदी, मुलीच्या लग्नासारखी अत्यंत महत्त्वाची कार्येही लांबणीवर पडतात. त्यामुळे स्वस्तात उपचाराचा कायदा लवकरच संसदेत मांडण्यात येईल, असे मोदी म्हणाले.
 
गरिबांना डॉक्टरांचे हस्ताक्षरही कळत नाही
काही डॉक्टर अशा पद्धतीने प्रिस्क्रिप्शन लिहून देतात की गरीब लोकांना त्यांचे हस्ताक्षरही कळत नाही. यामुळे त्यांना खासगी औषधी दुकानांतून महागडी औषधे विकत घेणे भाग पडते. आम्ही अशी कायदेशीर तरतूद करू की ज्यामुळे डाॅक्टरने प्रिस्क्रिप्शन लिहिले तर त्याला जेनेरिक औषधे लिहावी लागतील. जेणेकरून रुग्णांना इतर महागडी औषधे घ्यावी लागणार नाहीत.  
 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा,
- मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यात मोदी.. 
- ४७ प्रकारच्या आरोग्य चाचण्या मोफत : मुख्यमंत्री फडणवीस
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...