आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानचे PM शिंजो अॅबे आज भारत दौऱ्यावर, त्यांना 500 वर्षे जुन्या मशिदीत घेऊन जाणार मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे स्वागत करतील. अॅबे यांचा भारत दौरा विशेष आहे. देशात प्रथमच सुरु होणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची कोनशिला ते बसविणार आहे. त्यानंतर दोन्ही नेते बाराव्या भारत-जपान वार्षिक बैठकीत सहभागी होतील. अॅबे यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद आणि गांधीनगर नव्या नवरीसारखे सजवण्यात आले आहे. 
 
दोन देशांत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. “पंतप्रधान शिंजो आबे यांच्या स्वागतास आपण उत्सुक आहोत,’ असे ट्विट मोदींनी केले आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान चौथ्यांदा वार्षिक बैठक होत आहे. गांधीनगरच्या साबरमती आश्रमापर्यंत ते किलोमीटरच्या रोड शोमध्येही सहभागी होणार आहेत. 

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे उत्तर-पूर्व आशियात आण्विक हल्ल्याचे सावट असताना आबे भारत दौऱ्यावर आले हे विशेष. वास्तविक चीन, दक्षिण चीन सागरात पाय पसरण्यासाठी धोरण आखत आहे. विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांचा दृष्टिकोन टाळाटाळीचा आहे. त्यामुळे चीनसोबत संघर्ष झाल्यास अमेरिकेला विश्वासार्ह मानता येणार नाही. दुसरीकडे, डोकलाम वादात भारताने भूतानसारख्या छोट्या देशाची बाजू घेत चीनचा सडेतोड विरोध केला. भारताच्या या भूमिकेला जपानने सार्वजनिकरीत्या समर्थन दिले. त्यामुळे आशियात भारत जपान हे चीनच्या विस्तारवादी धोरणाविरोधात उभे राहू शकतात, असा संदेश जगभरात गेला. चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पाला (अाेबीअाेअार) प्रत्युत्तर देण्यासाठी भारत जपानने आशिया-आफ्रिकी बेल्टचे व्हिजन मांडले. या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात अनेक मोठे करार होऊ शकतात. 
 
मेक इन इंडिया : संरक्षण सामग्री बनवणाऱ्या कंपन्या येतील भारतात 
इंडाेनेशियातबुलेट ट्रेन चालवण्यात जपानला चीनकडून पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत अॅबे शिंकासेन बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान निर्यात करण्याची तयारी करत अाहेत. जपानसमाेर भारताचा चांगला पर्याय अाहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात बुलेट ट्रेन चालवण्याची माेठी घाेषणा हाेऊ शकते. दाेन्ही पंतप्रधान इतरही अनेक प्रकल्प सुरू करतील. जपानसाेबत सैन्य सहकार्य वाढवण्यासह भारतास शस्त्रास्त्रे अन्य सामग्रीच्या स्थानिक निर्मितीवर भर देण्यासाठी संरक्षण तंत्रज्ञान प्राप्त करण्यात मदत मिळण्याची शक्यता अाहे. त्यातून संरक्षण सामग्री बनवणाऱ्या जपानी कंपन्यांशी भारतात लढाऊ विमाने पाणबुड्या बनवण्याच्या प्रकल्पांवर चर्चा सुरू अाहे. 
 
घेराबंदी : अाफ्रिकी काॅरिडाॅरद्वारे चीनचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न 
भारतानेचीनच्या ‘वन बेल्ट-वन राेड’ (अाेबीअाेअार) प्रकल्पापासून स्वत:ला दूर ठेवले अाहे. या प्रकल्पाच्या प्रत्युत्तरादाखल भारताने अाफ्रिकी विकास बँकेच्या बैठकीत अाशिया-अाफ्रिका ग्राेथ काॅरिडाॅरचा शुभारंभ केला हाेता. हा माेदी अॅबे यांचा ड्रीम प्राेजेक्ट अाहे. या दाैऱ्यात अॅबे या प्रकल्पाशी निगडित अनेक करार करू शकतात. या माध्यमातून भारत जपान हे दाेन्ही देश अाशिया अाफ्रिकन देशांमध्ये क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करू इच्छित अाहेत. या प्रकल्पांतर्गत भारत जपान साेबत राहून अाफ्रिका, इराण, श्रीलंका दक्षिण-पूर्व अाशियात अनेक पायाभूत प्रकल्पांवर काम करत अाहेत. 
 
16व्या शतकातील सिदी सय्यद मशिदीतही जातील माेदी आणि अॅबे 
माेदीअॅबे हे अहमदाबादमधील प्रसिद्ध सिदी सय्यद मशिदीतही जातील. या 16व्या शतकातील मशिदीत माेदी हे शिंजाे यांच्या गाइडची भूमिका निभावतील. संध्याकाळी सात वाजता सूर्यास्तावेळी फाेटाे शूट हाेणार अाहे. 
 
बुलेट ट्रेनचा 25 टक्के खर्च महाराष्ट्र शासन करणार 
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. काल मंत्रीमंडळाच्या उपसमितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या पंचवीस टक्के खर्च राज्य शासन करणार असून, यासाठीच्या तीस हजार कोटी रुपयांच्या निधीसाठीही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पंतप्रधान जपानचे अॅबेंच्‍या स्‍वागतासाठी सजवण्‍यात आलेल्‍या गुजरातचे फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...