आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षांचा पगार केला दान; घड्याळ, पुस्तके, कुर्ते आणि स्वयंपाकी घेऊन गेले नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कालचा दिवस खुप भावपूर्ण राहिला. त्यांनी गुजरातला अलविदा करून दिल्लीसाठी प्रयाण केले. विमानात बसण्यापूर्वी मोदी म्हणाले, की आवजो गुजरात’! म्हणजेच गुड बाय गुजरात. चार दिवसांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी मोदींनी भावाच्या घरी जाऊन आई हिराबा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या आईने शगून म्हणून 101 रुपये दिले. आपल्या हातांनी पेढा भरवून अभिनंदन केले.
नरेंद्र मोदी अहमदाबाद येथून दिल्लीला ट्रेडमार्क शॉर्ट कुर्ते, घड्याळांचे कलेक्शन, काही पुस्तके, लॅपटॉप आणि आयपॅड घेऊन गेले. मोदी यांचा नियमित वापर करतात. यासह ते 12 वर्षांपासून त्यांच्याकडे काम करीत असलेल्या स्वयंपाकीलाही घेऊन गेले आहेत.
नरेंद्र मोदींनी 13 वर्षांचा पगार केला दान...वाचा पुढील स्लाईडवर