आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी म्हणाले : भ्रष्टाचारात बुडालेल्या काँग्रेसला काही सुचत नसल्यानेच ‘विकासा’ला शिव्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भाजपच्या गौरव महापरिषदेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल यांच्या “विकास वेडा झाला आहे’ या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले, त्यांना भ्रष्टाचार या एकाच बाबीची सवय जडली आहे. त्यांचे सरकार, नेते व कुटुंब भ्रष्टाचारात बुडाले आहेत. पक्षप्रमुखाची जामिनावर वाटचाल सुरू आहे.

गुजरात निवडणूक जाहीर होण्याआधीच्या पहिल्या सभेत मोदी म्हणाले,  ज्या पक्षाने एका कुटुंबातून एवढे नेते दिले, एवढे पंतप्रधान दिले, त्या पक्षाची भाषा एवढ्या खालच्या पातळीवर घसरली आहे. ही निवडणूक आमच्यासाठी विकासवादाची आहे, त्यांच्यासाठी ती घराणेशाहीचा लढा आहे. मोदी म्हणाले, काँग्रेसला गुजरात व गुजरातींचा द्वेष आहे. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा काँग्रेसवाल्यांनी कसे-कसे षडयंत्र रचले याचे सत्य समोर आहे. त्यांचे सरकार राजकीय आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकत होते. काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी. ते जातीय तणाव, चिथावणी, जातीय विष, भेदभाव करून निवडणूक जिंकतात. आम्ही ८ नोव्हेंबर काळा पैसा मुक्ती दिन म्हणून साजरा करू. या पक्षाने वल्लभभाई पटेल व त्यांची कन्या मणिबेन यांना कशी वागणूक दिली, मोरारजी देसाईंबाबत काय निर्णय घेतला, त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी काय काय केले नाही, असा सवाल माेदींनी केला.

महिन्याभरात चौथ्यांदा मोदी गुजरातला
- गेल्या एक महिन्यात (साधरणतः 32 दिवसांत) मोदींचा हा चौथा गुजरात दौरा आहे. 
- याआधी 14 सप्टेंबरला त्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेनची कोलनशिला ठेवली होती. 
- त्यानतंर 17 सप्टेंबरला स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मोदी राज्याच्या दौऱ्यावर आले होते. 
- 7 ऑक्टोबरला ते दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते. तेव्हा राजकोट, वडनगर आमि गांधीनगर येथे अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले होते. काही योजनांचे लोकार्पणही मोदींने केले.
- 8 ऑक्टोबरला मोदी त्यांचे गाव वडनगर येथेही गेले होते. याभागात त्यांनी रोड शो केला होता.
बातम्या आणखी आहेत...