आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविणार मोदी, समर्थकांनी लावले बॅनर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूज, गुजरात - कच्छ मधील भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दलचे बॅनर झळकावून मोदीच भाजपचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे. या बॅनरवर कच्छमधील लालन महाविद्यालयाचे आणि त्यानंतर दिल्लीतील लालकिल्ल्याचे चित्र आहे.

येत्या 15 ऑगस्ट रोजी कच्छमधील लालन महाविद्यालयात गुजरातचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. गेल्या एक दशकापासून राष्ट्रीय सण हे राजधानी बाहेर साजरे करण्याची येथे प्रथा आहे. यंदा स्वातंत्र्य दिनाचे यजमानपद कच्छ जिल्ह्याला मिळाले आहे. राज्याचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम कच्छमधील भूज येथील लालन महाविद्यालयात साजरा केला जाणार आहे. त्यानिमीत्त भूजच्या टॉऊन हॉल परिसरात मोदींच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत.