आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाने 12 उद्योजकांना ठकवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा - मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फटका गुजरातच्या काही उद्योजकांना बसल्याची घटना येथे घडली. अमेरिकेत इंडियन ट्रेड फेअरमध्ये स्टॉलची विक्री करण्याच्या नावावर एका ठकाने राज्यातील 12 उद्योजकांना 10 लाख रुपयांची शेंडी लावली.

ऋषी भावसार असे ठकाचे नाव असून तो अहमदाबादचा आहे. त्याने 12 उद्योजकांना आपल्या जाळ्यात ओढले आणि पैसे वसूल केले होते. यातील पाच उद्योजक अमेरिकेत पोहोचले, तेव्हा त्यांना नियोजित ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यापारी मेळा नसल्याचे लक्षात आले. त्या अगोदर ऋषीने त्यांना न्यूजर्सीमध्ये 22 ते 24 नोव्हेंबर 2013 दरम्यान आंतरराष्ट्रीय मेळा आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली होती. हा मेळा अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित होता. या उपक्रमाला मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मंत्री सौरभ पटेल आणि वजूभाई वाला (विधानसभा अध्यक्ष) यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. एका स्टॉलसाठी 60 हजार व 15 हजार रुपये व्हिसा असा खर्च त्याने सांगितला होता. जयदीप मोदी व त्यांच्या उद्योजक 11 मित्रांनी ही रक्कम धनादेशाद्वारे त्याला दिली होती.