आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीही परीक्षा देत आहे, काळजी करू नका; विद्यार्थ्यांना मोदीचा शुभेच्छा संदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा दूरध्वनी संदेश सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या घरी येत आहे. पालक मोदी यांचा फोन उचलतात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. मोदी म्हणतात, ‘हॅलो, विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्याप्रमाणेच परीक्षा देत आहे. माझ्याप्रमाणे तुम्हीही काळजी करू नका.’

संदेशात मोदी पुढे म्हणतात, आयुष्यात परीक्षेची वेळ येणे नैसर्गिक आहे. तुमच्या कष्टाचे चीज होईल. 10 वी व 12 वी आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे. आपले आई-वडील, शिक्षक व तुम्ही स्वत: जे कष्ट घेतले आहेत, त्याला यश मिळेल. गुजरातमध्ये बोर्ड परीक्षा सुरू होत आहेत. जवळपास 17 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत.


निवडणूक गणित
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये असा संदेश येणे हे निवडणूक गणिताच्या दृष्टीने पाहिले जात आहे. बहुतांश दूरध्वनी पालकांच्या मोबाइलवर येत आहेत. विद्यार्थी भलेही मतदार नसतील, मात्र त्यांचे पालक तर आहेत, हा हेतू बाळगून फोन केले जात असल्याचे सांगण्यात येते.

शिक्षण मंडळाला माहीत नाही
गुजरात शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आर. आर. वरसाणी यांनी शुभेच्छा संदेशाच्या दूरध्वनीची माहिती नसल्याचे सांगितले. आमच्याकडे असा कोणताच डाटा उपलब्ध नसल्याचे ते म्हणाले.