आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी यांची यूपीआधी गुजरातमधून उमेदवारी निश्चित- विजय रुपाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद/ नवी दिल्ली- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी गुजरातच्या कोणत्याही एका मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले. पक्षाच्या गुजरात शाखेने गुरुवारी याची घोषणा केली आहे. असे असले तरी त्यांची उत्तर प्रदेशातील दुसर्‍या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या शक्यतेचा इन्कार केला नाही. प्रदेश भाजपचे सरचिटणीस विजय रुपाणी म्हणाले, मोदी गुजरातच्या चार जागांवर- अहमदाबाद, राजकोट, वडोदरा आणि सुरतपैकी कुठल्याही एका ठिकाणावरून लढतील. त्यांनी गुजरातमधून लढावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, यापैकी कोणत्या जागेवरून लढणार ते ठरले नाही. उत्तर प्रदेशातून नशीब आजमावण्याच्या प्रश्नावर रुपाणी म्हणाले, मला जागेबाबत माहिती नाही. मात्र, याचा निर्णय केंद्रीय संसदीय पक्ष घेईल. दिल्लीत संसदीय पक्षाच्या बैठकीत गुजरातच्या मतदारसंघातील उमेदवारांबाबत चर्चा झाली नाही.

रात्री उशिरापर्यंत बैठक चालली
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप निवडणूक समितीची बैठक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चालली. जवळपास 150 उमेदवारांची नावे निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. हे उमेदवार बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मणिपूरमधील आहेत. बिहारमधील 24 मतदारसंघांतील नावे ठरली आहेत. सर्व 12 खासदारांना तिकिटे दिली आहेत. लखनऊ, वाराणसी आणि कानपूर जागांबाबत चित्र स्पष्ट झाले नाही. राजनाथसिंह यांनी या वेळी गाझियाबादऐवजी लखनऊमधून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे.

यांनाही तिकीट मिळण्याची शक्यता
# बेल्लारी : श्रीरामुलू
# चिकमंगळूर : शोभा करंदलाजे
# म्हैसूर : प्रताप सिन्हा
# छत्तीसगड : रमण सिंह यांचे पुत्र अभिषेक
# दार्जिलिंग : एस. एस. अहलुवालिया