आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Jashodaben Like To Read His News

नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, "पत्नी" जशोदाबेन यांना पूर्ण विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद (गुजरात)- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेच पुढील पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांची कथित पत्नी जशोदाबेन यांनी व्यक्त केला आहे. मोदींबाबत काहीही लिहिले असतील तर मला ते वाचायला आवडते, असेही प्रांजळपणे जशोदाबेन सांगितात.
एका इंग्रजी वृत्तपत्राने जशोदाबेन यांची मुलाखत घेतली आहे. यावेळीही जशोदाबेन यांनी नरेंद्र मोदी माझे पती होते, असा दावा केला आहे. 62 वर्षीय जशोदाबेन शाळेत शिक्षिका होत्या. आता त्या निवृत्त झाल्या आहेत. वयाच्या 17 व्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझे लग्न झाले होते. त्यानंतर तीन वर्षांनी आम्ही आमच्या अटींवर वेगवेगळे झालो, असेही त्यांनी सांगितले आहे.
जशोदाबेन यांना 14,000 निवृत्ती वेतन मिळते. सध्या त्या भावाच्या घरी राहतात. त्यांचा बहुतांश वेळ प्रार्थनेत जातो.
मुलाखत देताना मोदींसोबत घालविलेल्या क्षणांविषयी बोतताना जशोदाबेन म्हणाल्या, की नरेंद्र मोदी यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर मी सासरी गेली. त्यानंतर मी माझे शिक्षण बंद केले. परंतु, मी शिक्षण पूर्ण करावे अशी त्यांची भूमिका होती. यासंदर्भात आमची बऱ्याच वेळा चर्चा झाली. त्यांना माझ्यासोबत बोलायला आवडायचे. स्वयंपाकातही ते मला मदत करायचे. परंतु, तीन वर्षांनी आम्ही वेगवेगळे झालो. आम्ही आमच्या अटींवर वेगवेगळे झालो. तेव्हापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात नाही. परंतु, मला त्यांच्यासंदर्भात असलेल्या बातम्या आणि लेख वाचायला आवडतात. त्यांच्या मी शोध घेत असते.