आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Resigns From Vadodara News In Marathi

मोदींनी बडोद्यातून दिला राजीनामा, जाणून घ्या कोण राहू शकतात उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोदा लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभेत ते वाराणसीचे प्रतिनिधित्व करतील. आता बडोद्याची लोकसभा सीट रिक्त झाली आहे. भारतीय जनता पक्ष आता बडोदा येथून एखाद्या मोठ्या नेत्याला उमेदवारी देईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
यासाठी नरेंद्र मोदी यांचे विश्वासू अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री स्मृती इराणी यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला 71 जागा मिळाल्या. याचे श्रेय अमित शहा यांना जाते. त्यामुळे त्यांना पीएमओमध्ये महत्त्वाचे पद किंवा भाजपचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते. दुसरीकडे अरुण जेटली अमृतसर येथून तर स्मृती इराणी यांना अमेठी येथून पराभव पत्करावा लागला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, बडोद्यासाठी कोणकोणत्या नेत्यांच्या नावावर चर्चा सुरू आहे....