आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारगिल युद्धात मोदींची होती गुप्त भूमिका, वॉशिंग्टनला जाऊन टाकला अमेरिकेवर दबाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याला एक आठवडा उरला आहे. त्याआधी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला मोदींसंदर्भातील खळबळजनक माहिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इंडो-यूएसए समिटची तयारी करत असलेल्या विविध एजंसीजकडे हे दस्तऐवज आहे. त्यातून 1999 मध्ये झालेल्या भारत - पाकिस्तान कारगिल युद्धात मोदींची गुप्त भूमिका असल्याचे उल्लेख आहेत.
नरेंद्र मोदी 1 जुलै 1999 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रचारक म्हणून न्यूजर्सी येथे गेले होते. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे, मोदींच्या या दौर्‍यानंतर पाचच दिवसांनी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ वॉशिंग्टनला गेले होते.
मोदींची काय होती भूमिका
आरएसएस प्रचारक म्हणून मोदींना अमेरिकन सरकारवर दबाव टाकण्यासाठी वॉशिंग्टनला पाठविण्यात आले होते. कारगिल युद्धावेळी अमेरिकेचे राष्टाध्यक्ष बिल क्लिंटन होते. त्यांचा पाकिस्तानाला पाठिंबा होता. तर, भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची इच्छा होती, अमेरिकेने पाकिस्तानवर युद्ध बंद करण्यासाठी दबाव टाकावा. त्यासाठीच अमेरिकेच्या काँग्रेस खासदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. येथे आरएसएसने महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्यांनी नरेंद्र मोदींना त्यासाठी अमेरिकेला पाठविले होते. तिथे त्यांनी ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ दी बीजेपी यांच्या सरकार्याने अमेरिकन खासदारांसोबत बैठक केली होती. त्यानंतर खासदारांनी पाकिस्तानला मागे हटविण्याचे आदेश देण्यासाठी क्लिंटन सरकारवर दबाव टाकला.
पुढील स्लाइडमध्ये न्यूजर्सीमध्ये होता मोदींचा मुक्काम

फोटो- 1993 मध्ये मोदी शिकागो दौर्‍यावर असताना