आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi To Get A Brand New Office In R 150 Crore Complex

नरेंद्र मोदी आजपासून बसतील 150 कोटी रुपयांच्या बुलेटप्रूफ कार्यालयात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा आजपासून (सोमवार) सुमारे 150 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बुलेटप्रूफ कार्यालयात बसणार आहेत. 'स्वर्णिम संकुल-1' नामक पाच मजली इमारतीत मोदींचे आलिशान ऑफिस असणार आहे. अवघ्या एका वर्षात ही इमारत उभारण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते सोमवारी या इमारतीचे उद्‍घाटन होणार आहे.

नव्या इमारतीत मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालय, अन्य मंत्र्याचे कार्यालये, मंत्रिमंडळाचा बैठक हॉल, सचिवांसाठी स्वतंत्र दालने, अतिथी कक्ष, डाटा सेंटर आदी कार्यालये आहेत. उल्लेखनिय म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय पूर्णपणे बुलटप्रुफ आहे. एक हजाराहून अधिक सरकारी कर्मचारी या इमारतीमध्ये कार्य करू शकतात.

मुख्यमंत्री मोदी यांचे आलिशान कार्यालयाची नवी इमारत दिल्लीतील ‘साउथ ब्लॉक’ डोळ्यासमोर ठेऊन उभारण्यात आली आहे. दिल्लीतील नार्थ आणि साउथ ब्लॉकच्या धर्तीवर गुजरात विधानसभा भवन आणि सचिवालय उभारण्यात आले होते. दिल्लीत साउथ ब्लॉकमध्ये पंतप्रधान कार्यालय आहे तर गांधीनगरमधील नार्थ ब्लॉक (आता स्वर्णिम संकुल-1) गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा नवा पत्ता असेल. दरअसल,

क्लिक करा पुढील स्लाइडवर...