आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे नरेंद्र मोदींच्या भावाचा बंगला, B'Day ला आईचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - येत्या 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. यादिवशी ते गांधीनगर येथे राहाणारे त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्या घरी आई हीराबा यांच्या भेटीसाठी येतील.
पंकज मोदी पंतप्रधान मोदींचे धाकटे बंधू
- पंकज गांधीनगरमधील रायसण येथील एका सोसायटीत राहातात. ते माहिती उपसंचालक पदावरुन निवृत्त झाले आहेत.
- 2014 मध्ये त्यांना प्रमोशन मिळाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी आई आणि कुटुंबासह शासकीय निवासस्थान सोडले आणि या नव्या बंगल्यात राहायला आले.
- मागील वाढदिवशी मोदी आईच्या भेटीला येऊ शकले नव्हते. त्याआधी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर आईचा आशीर्वाद घेण्यासाठी मोदी येथे आले होते.
पंकज मोदींचा नवा बंगला
- गांधीनगर जवळील रायसण येथील वृंदावन सोसायटीमध्ये पंकज मोदींनी नवा बंगला खरेदी केला आहे.
- याआधी गांधीनगरमधील सेक्टर 22 येथील सरकारी निवासस्थानात ते राहात होते. नरेंद्र मोदी आईला भेटण्यासाठी येथेच येत होते.
- सूत्रांच्या माहितीनुसार मोदी आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर मोठे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या भेटीसाठीही जातील.
- प्रल्हाद यांची कन्या निकूंजबेन यांचे 6 सप्टेंबरला निधन झाले. त्यावेळी मोदी जी-20 परिषदेसाठी विदेशात होते.
- भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रल्हाद यांना फोन करुन सांत्वन केले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...