आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज अक्षरधाम मंदिरात जाणार नरेंद्र मोदी, पुन्हा मिळू शकतो पाटिदारांचा पाठिंबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर - नरेंद्र मोदी गुरुवारी येथील स्वामीनारायण संप्रदायाच्या अक्षरधाम मंदिरात रौप्य महोत्सवी सोहळ्यात सहभागी होणआर आहेत. अडिच महिन्यांनी मोदी याठिकाणी पुन्हा येत आहेत. याआधी मोदी 15 ऑगस्टला अक्षरधामला आले होते. या भेटीमागे अनेक राजकीय अन्वयार्थ आहेत. गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून पाटिदार भाजपवर नाराज आहेत.  स्वामीनारायण संप्रदायात पाटिदारांचे प्रमाण मोठे आहे. मोदींच्या दौऱ्यामुळे पुन्हा त्यांना भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 18 डिसेंबरपर्यंत निकाल हाती येतील. 
 
सायंकाळी पोहोचणार मोदी...
- पंतप्रधान मोदी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता एअरफोर्सच्या स्पेशल प्लेनद्वारे अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचतील. त्यानंतर ते राजभवनात जातील. सायंकाळी मोदी मुख्यमंत्री निवासच्या अगदी जवळ असलेल्या अक्षरधाम मंदिरात जातील त्याठिकाणी या मंदिराला 25 वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 15 मिनिटांचा लाइट अँड साऊंड शो 'अक्षरधाम सनातनम' पाहतील. 
- याठिकाणी ते सुमारे 25 हजार हरिभक्तांनाही संबोधित करतील. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना सप्टेंबर 2002 मध्ये या मंदिरावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात दोन दहशतवाद्यांसह 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. 
 
पाटीदारांमध्ये अक्षरधामचे विशेष महत्तव 
- मोदी 15 ऑगस्टला जेव्हा गुजरातमध्ये आले होते तेव्हा स्वामीनारायण संप्रदायाच्या मुख्य स्वामींच्या निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी त्यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी स्वामी हे आपल्या पित्यासारखे होते असे म्हटले होते. प्रमुख स्वामींचे माझ्यावर खूप प्रेम होते, असे मोदींनी सांगितले होते. 
- स्वामीनारायण संप्रदायाचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. त्यातही पाटीदारांची संख्या अधिक आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची भाजपवर नाराजी आहे. हार्दिक पटेलने काँग्रेसला पाठिंबा देण्याचे अनेक संकेत दिले आहेत. 
 
पाटीदारांना समजले जाते भाजप समर्थक.. 
- साधारणपणे पाटीदार समाज हा भाजपतचा मतदार असल्याचे समजले जाते. हार्दिक पटेलच्या नेतृत्वात आंदोलन झाले तेव्हा हासमाज भाजपपासून दूर गेल्याचे पाहायला मिळाले होते. मोदींचा अक्षरधाम दौरा पुन्हा एकदा पाटीदारांना भाजपकडे आकर्षित करण्यात फायदेशीर ठरू शकते. एका रिपोर्टनुसार पाटीदार समाजाच्या जुन्या पिढीतील लोक अजूनही भाजप समर्थकच समजले जातात. 
 
पाटीदार महत्त्वाचे का ?
पाटीदार मते 20%
20%पाटीदारांत लेवा 60%
20%पाटीदारांत कडवा 40%
2012म भाजपला पाटीदारांची मिळालेली मते 80%
भाजपच्या 182 पैकी 44 आमदार पाटीदार 
महत्त्वाचे का ? 19 वर्षांपासून BJP सत्तेत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका.. 
2015 मध्ये पटेल आंदोलन सुरू होते तेव्हा, 11 जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींपैकी 8 मध्ये काँग्रेस आघाडीवर राहिले. 
 
कोण कोणाबरोबर... 
गुजरात विधानसभा निवडणूक : सध्या कोण कोणाबरोबर?
जिग्नेश मेवाणी : जिग्नेश मेवाणी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे नेते आहेत. ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत, पण भाजपच्या विरोधी गटाला पाठिंबा देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. 
छोटू भाई वासवा : झगडिया विधानसभा मतदारसंघातील JDU चे आमदार आहेत. शनिवारी (28 ऑक्टोबर) राहुल गांधींना भेटल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या साथीने निवडणूक लढवणार आणि जिंकणार असल्याचे म्हटले होते. 
अल्पेश ठाकोर : OBC नेते आहेत, त्यांनी 23 ऑक्टोबरला काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 
रेश्मा आणि वरुण पटेल : दोघे पाटिदार नेते हार्दिक पटेल यांचे नीकटवर्तीय समजले जातात. 23 ऑक्टोबरला अमित शाह यांना भेटल्यानंतर त्यांनी BJP मध्ये प्रवेश केला. 
 
गुजरातमधील कास्ट फॅक्टर.. 
पाटीदार 20%
मुस्लिम 9%
पाटीदार+मुस्लिम29%
सवर्ण 20%
ओबीसी 30%
केएचए: क्षत्रिय, हरिजन आदिवासी 21%
सवर्ण+ओबीसी+केएचए 71%
 
बातम्या आणखी आहेत...