आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडोद्यात नरेंद्र मोदींविरुद्ध लातूरचे सुनील कुलकर्णी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध बडोद्यातून मूळ लातूर येथील सामाजिक
कार्यकर्ते सुनील दिगंबर कुलकर्णी यांना ‘आप’ने उमेदवारी दिली आहे.
व्यवसायाने बिल्डर असलेले कुलकर्णी मुंबईत अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनात, माहिती अधिकार चळवळीतही सक्रिय होते. सहा वर्षांपासून कुलकर्णी बडोद्यात स्थायिक आहेत. ते बुधवारी उमेदवारी अर्ज भरतील. दरम्यान, वाराणसीतून कॉँग्रेसने मोदींविरुद्ध अजय रॉय यांना उमेदवारी दिली आहे.
लातूर भूकंपात कार्य
नाशिक येथे जन्मलेले कुलकर्णी यांनी 1991 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर स्वत:चा उद्योग सुरू केला. लातूर, कच्छ येथील भूकंप पुनर्वसन कार्यातही त्यांचा सहभाग होता.