आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Will File His Nomination From Vadodara

मी विवाहित ; मोदींनी उमेदवारी अर्जात प्रथमच दिली माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा - आपण विवाहित असल्याचे नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच लेखी स्वरूपात मान्य केले आहे. बडोद्यात उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात मोदी यांनी स्वत:ला विवाहित घोषित करत पत्नी म्हणून ‘जशोदाबेन’ नाव लिहिले आहे. तथापि जशोदाबेन यांचा पॅन नंबर, आयकर विवरणपत्रे, मालमत्ता, बँक खाते, म्युच्युअल फंड, विमा पॉलिसी, कर्ज, दागिने, जमीन, घर आदीबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही मोदी यांनी त्यात म्हटले आहे. मोदी 2002पासून निवडणुका लढवत आहेत. यंदा त्यांची पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. परंतु पत्नीच्या माहितीचा रकाना ते आतापर्यंत रिकामाच सोडत होते. आपल्या वैवाहिक स्थितीबाबत त्यांनी कधीही माहिती दिली नव्हती. मात्र सर्वाेच्च् न्यायालयाच्या आदेशानंतर अर्जात संपूर्ण माहिती भरणे सक्तीचे झाले आहे.