आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modis Brothers Not Present At Oath Ceremony

मोदींचे भाऊ म्हणाले, 'शपथविधीला जाऊन भावाला अडचणीत टाकायचे नव्हते...'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - नरेंद्र मोदी यांनी देशाचे 15वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्यावेळी देश परदेशातील दिग्गजांसह हजारो लोक उपस्थित होते. मात्र, त्याचवेळी या सोहळ्यात त्यांच्या कुटुंबीयांपैकी एकाही सदस्याची उपस्थिती नव्हती. मोदींचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी याची कारणे पत्रकारांनी सांगितली. ते म्हणाले...

1. आम्ही शपथविधीला गेलो असतो. पण त्यामुळे मोदींचे लक्ष विचलित होण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष दिल्लीला जाण्याऐवजी टीव्हीवर सोहळा पाहणे पसंत केले.

2. आमच्यापैकी कोणी दिल्लीला गेले नाही त्याचे आणखी एक कारण म्हणजे, आम्ही गेल्यावर आम्हाला वेगळी वागणूक दिली किंवा पक्षपात केला असा आरोप मोदींवर लावला जाऊ शकला असाता. त्यामुळे कोणी त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांना अडचणीत आणू नये असे आम्हाला वाटत नव्हते.

3. नरेंद्र मोदींचे मोठे भाऊ सोमभाई आणि त्यांचे कुटुंबही टिव्हीवरच मोदींचा शपथविधी सोहळा पाहत होते. सोमभाई म्हमाले, 'आमच्यामुळे काहीही अडचण येऊ नये एवढेच आम्हाला वाटत होते. नरेंद्र मोदींनीही भावाला किंवा नातेवाईकांना वेगले स्थान दिले असे म्हणण्याची संधी आम्हाला कोणाला द्यायची नव्हती.'
छायाचित्रात गांधीनगर येथे मोदींच्या लहान भावाच्या घरी टीव्हीवर शपथविधी सोहळा पाहणा-या त्यांच्या आई हिराबेन.
पुढे वाचा - सलमानच्या पूर्ण कुटुंबाला आमंत्रण, शाहरूख आमीरला मात्र नाही