आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narmada Project Hight Issue News In Marathi, Medha Patkar

नर्मदा प्रकल्पाची उंची 17 मीटरने वाढणार; आठ वर्षांनंतर मान्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- नर्मदा धरणाची उंची 17 मीटरने वाढवण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला आहे. त्यामुळे धरणाची उंची 121 मीटरवरून 138.72 मीटर होईल. गुजरात सरकारच्या प्रस्तावाला नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने (एनसीए) मंजुरी दिल्याची घोषणा मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी जुनागडमधील एका कार्यक्रमात केली.

नर्मदा धरणाची उंची 121.92 मीटरवरून 138.72 मीटरपर्यंत वाढवावी, असा प्रस्ताव आठ वर्षांपूर्वी गुजरात सरकारने एनसीएकडे दिला होता. दिल्लीत गुरुवारी झालेल्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आल्याचे पटेल यांनी जाहीर केले. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पंधरवड्यातच हा निर्णय झाला. राज्याचे आरोग्यमंत्री आणि प्रवक्ता नितीन पटेल यांनी सांगितले की, एनसीएने उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याने आता आम्हाला धरणस्थळी खांब उभारावे लागतील. तसेच दरवाजे बसवावे लागतील. धरणाचे 121.92 मीटरपर्यंतचे बांधकाम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. सध्याच्या पाणीसाठय़ाच्या क्षमतेपेक्षा तिप्पट साठा करता येणार असल्याने राज्याला त्याचा मोठा फायदा होणार आहे. जलविद्युत निर्मितीही पूर्ण क्षमतेने करणे शक्य होणार आहे.
निर्णय लोकशाही पद्धतीने घेतला नाही
हा निर्णय लोकशाही पद्धतीने घेतलेला नाही. सरकारने आमचे म्हणणे ऐकून तर घेतले नाहीच, पण वस्तुस्थिती जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. संबंधित मंत्र्यांशीही चर्चा केली नाही. कायद्याचे उल्लंघन करून धरणाची उंची वाढवता येईल का?
- मेधा पाटकर, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या