आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nation Will Compare Speeches From Lal Quila, Gujarat: Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाचे लक्ष कुणाकडे, लाल किल्ला की लालन कॉलेज? नरेंद्र मोदींचे पंतप्रधानांना आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूज - ‘स्वातंत्र्यदिनी देशाचे लक्ष लाल किल्ला आणि लालन कॉलेज (भुज, गुजरात) या दोनच ठिकाणी असेल,’ अशा शब्दांत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला थेट पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनाच आव्हान दिले आहे.

एके ठिकाणी खोट्या आश्वासनांची खैरात होईल, तर दुसर्‍या ठिकाणी विकासाचा मार्ग दाखवला जाईल, असे मोदी यांनी म्हटले आहे. भुजमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी गुरुवारी आपण केलेल्या कार्याचा हिशेब जनतेला देऊ, असे सांगितले. कच्छचे मुख्यालय असलेल्या भूजमध्ये गुजरात सरकारचा मुख्य ध्वजारोहण सोहळा होत आहे. लालन कॉलेजच्या मैदानावर होणार्‍या या सोहळ्यात होणार्‍या मोदींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोदींचा दावा खोटा : माहिती-तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी बुधवारी मोदींवर टीका केली. मोदी खोटे आकडे लोकांसमोर मांडून आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, संसदीय कामकाजमंत्री राजीव शुक्ला यांनी मोदी घमेंडखोर माणूस असल्याचे म्हटले आहे.