आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Level Shooter Pushpa Gupta Now Runs A Roadside Noodles Shop

PM मोदींच्या गुजरातमध्ये \'नॅशनल शूटर\'वर नूडल्स विकून गुजराण करण्याची वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य गुजरातमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे, नॅशनल शूटर पुष्पा गुप्ता प्रॅक्टिस सोडून रस्त्याच्या कडेला नूडल्स विकून गुजराण करण्याची ‍वेळ आली आहे.

पुष्पा गुप्ता हिने बडोद्यात रस्त्याच्या कडेला नूडल्सचा व्यवसाय सुरु केला आहे. शूटींग हा प्रचंड महागडा क्रीडाप्रकार आहे. वडिलांना आता आपल्या पॅशनवर खर्च करणे कठीण झाले आहे. त्यामुळे आपण नूडल्सची गाडी सुरु केल्याचे 21 वर्षीय स्टार अॅथलीटने सांगितले.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्याकडे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद होते. मोदी नेहमी गुजरातमधील क्रीडापटूंना प्रोत्साहन देत असतात. परंतु, स्टार अॅथलीट पुष्पा गुप्ता का दुर्लक्षीत राहिली, हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

पुष्पाने नूडल्स गाडीवर टांगले मेडल्स...
पुष्पा गुप्ता हिने नूडल्स गाडीला सर्व बाजुंनी एक-एक मेडल टांगले आहे. हे मेडल तिने एकेकाळात विविध स्पर्धेत मिळवले आहेत. लोक पुष्पाची नूडल्सची गाडी पाहतच राहातात. तसेच जास्तीत जास्त ग्राहक आकर्षितही होतात.

पुष्पाने आता शूटिंगचा महागडा खेळ सोडून घर चालवण्यासाठी एक-एक रुपया जमवत आहे. 2013 मध्ये तिने महाविद्यालयातही प्रवेश घेतला होता. तिने एनसीसी देखील ज्वाइन केले होते. परंतु घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला शूटिंग सोडून नूडल्सची गाडी चावण्याची वेळ आली आहे. पुष्पाने अनेक स्पर्धेत गुजरातचे प्रतिनिधित्वही केले होते.

पुष्पाच्या वडिलांनी साधला सरकारवर निशाणा:
पुष्पाचे व‍डील दिनेशकुमार गुप्ता यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी महिला सशक्तिकरणावर चर्चा करतात. परंतु ते केवळ टीव्ही व वृत्तपत्रापर्यंत सीमित आहे. वास्तव मात्र वेगळेच आहे. आम जनतेला मोदींच्या चर्चेचा कोणताही लाभ मिळत नसल्याचे दिनेशकुमार गुप्ता यांनी म्हटले आहे.

दिनेशकुमार यांनी सांगितले की, त्यांच्या परिसराच्या आमदार महिला आहे. इतकेच नव्हे तर राज्याच्या मुख्यमंत्री देखील महिलाच आहे. पुष्पाला गुजरात सरकारतर्फे काही प्रोत्साहनपर सहकार्य मिळाले असते ती तिच्यावर नूडल्स गाडी चालवण्याची वेळ आली नसती.

पुढील स्लाइडवर पाहा, पुष्पाची मेडल टांगलेली नूडल्सची गाडी...