(फायरिंगचे ट्रेनिंग घेत असलेले एन.सी.सी कॅडेट्स)
पोरबंदरः नौदल सैनिकांनी पोरबंदरच्या समुद्रामध्ये भारतीय नौदलाच्या शक्तीचे प्रदर्शन केले. समुद्राच्या मध्यभागी अंधाधुंद गोळीबार तसेच रेस्क्यू ऑपरेशनची ट्रेनिंग दिली गेली. एन.सी.सी. कॅडेट्स ला नौसेनेची कार्यवाहीबददल माहिती मिळावी यासाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोरबंदरच्या समुद्रात नेव्हीच्या अनेक ट्रेइन शिप्स तरंगताना दिसल्या.
पोरबंद नेवल बेइझने पोरबंदर आणि जामनगरच्या एनसीसी कॅडेट्सना विशेष ट्रेनिंग देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या ड्रीलमध्ये तीर आणि सुजाता नावाच्या दोन ट्रेईनी शीपची मदत घेण्यात आली. ट्रेनिंगसाठी या दोन्ही ट्रेइनी शीप एनसीसी कॅडेट्सना घेऊन पोरबंदरपासून 50 नोटिकलमैल दूर समुद्रात गेली. जेथे कॅडेट्सना एलएमजी. गन फायरिंग, फायर रेस्क्यू ऑपरेशन आणि एक जहाजातून दुसर्या जहाजात माल पोहोचवण्याचे ट्रेनिंग देण्यात आले.