आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 कोटीच्‍या हायटेक ऑफिसमध्‍ये मोदी बसले फरशीवर, पहा छायाचित्रे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- दिल्‍लीमध्‍ये आम आदमी पार्टी (आप) चे सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर व्‍हीआयपी संस्‍‍कृतीच्‍या विरोधात नगारे वाजायला सुरूवात झाली आहे. दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्‍यानंतर केजरीवाल कोणत्‍या बगंल्‍यात राहतात, तो बगंला किती रूमचा आहे, या सारख्‍या विषयावर चर्चा झडू लागल्‍या. सरकारी गाड्या, लाल दिव्‍याच्‍या गाड्या वापरायच्‍या का नाही, यावर परिसंवाद घडू लागले.
याच दरम्यान भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्‍यंमत्री नरेंद्र मोदी यांनी आपण सर्वसामन्‍य आहोत हे दाखवण्‍यासाठी वेगळे प्रयोग करू लागले आहेत. सोमवारी गांधीनगरमध्‍ये भाजपच्‍या नविन 'कमलम' कार्यालयाचे उद्घाटन करण्‍यात आले. या प्रसंगी कार्यालयाच्‍या पाय-यावर बसून कार्यकर्त्‍यांसोबत मोदी यांनी फोटो काढली व आपण सर्वसामान्‍य आहोत हे दाखवण्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळी भाजपचे जेष्‍ठ नेते लालकृष्‍ण आडवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गांधीनगर जवळ बनवण्‍यात आलेल्‍या 'कमलम' हे कार्यलय उभारण्‍यासाठी 18 कोटी रूपये खर्च करण्‍यात आले आहेत. 12 हजार स्‍कोयर फुटच्‍या आवरात बवण्‍यात आलेले कार्यलय कॉर्पोरेट स्‍टाईलचे आहे.
कार्यालयाची वैशिष्‍ट्ये -
- ए. सी. कॉन्‍फरन्‍स हॉल.
- राजकीय सभेसाठी मोठा हॉल.
- पदाधीका-यांसाठी 20 मोठे चेंबर्स
- प्रत्‍येक हॉल व रूम मध्‍ये सगंनक आणि वाई-फाईची सुविधा.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि पहा 'कमलम' या कार्यालयाची छायाचित्रे....