आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा रक्तगट जगात कुणाचाच नाही! रक्तगटाचे नाव INRA

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत- सूरतमध्येएका युवकाचा रक्तगट पाहून डॉक्टरही चक्रावले आहेत. कारण, हा रक्तगट A, B, O, AB पैकी कुणाशीच जुळत नाही. जगात एकाही व्यक्तीचा रक्तगट असा नसल्याचा दावा डॉक्टर करत आहेत. म्हणजेच, हा युवक रक्तदान करू शकणार नाही किंवा कुणाचे रक्त याला देता येणार नाही. डॉक्टरांनी या रक्तगटाचे नाव INRA ठेवले आहे.

या नावात पहिले दोन शब्द इंडिया या शब्दातून तर नंतरचे दोन शब्द युवकाच्या नावातून घेण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेनेही याला मान्यता दिली.

सूरतमध्ये लोकसमर्पण रक्तदान संस्थेच्या प्रयोगशाळेत हा नवा रक्तगट सापडला. डॉ. सनमुख जोशी, डॉ. किंजल मेंदपरा आणि डॉ. अंकिता शेलडिया या शिबिरात होते. हा अचंबित करणारा रक्तगट सापडल्यानंतर डॉक्टरांनी नमुने जागतिक आरोग्य संघटनेला पाठवले. या डॉक्टरांच्या प्रयोगशाळेतही रक्त तपासले. परंतु, या रक्ताचा नमुना कोणत्याच रक्तगटाशी जुळला नाही. डॉक्टरांनी या युवकाचे नाव जाहीर केलेले नाही.

जगात दुर्मिळ रक्तगट
जगात अगदी वेगळा रक्तगट असलेल्या एकूण सात व्यक्ती आहेत. डॉ. जोशी म्हणाले, ‘वैद्यकीय भाषेत याला COLTOL म्हणतात. यापैकी एक भारतात आहे. याशिवाय बॉम्बे रक्तगट दुर्मिळ असून तो हजारांत एखाद्याचा असतो.’ अशांना रक्ताची गरज पडल्यास अडचण होते.
बातम्या आणखी आहेत...