आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात प्रथमच छातीत छिद्र पाडून व्हॉल्व्ह बदलला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - हृदयाचा व्हॉल्व्ह बदलण्यासाठी आजही ओपन हार्ट सर्जरीच किंवा ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) शस्त्रक्रिया करावी लागते. टीएव्हीआर पद्धतीत खांदा व जांघेतून जाणार्‍या मुख्य धमन्यांच्या (आर्टरीज) आतून हृदयापर्यंत कृत्रिम व्हॉल्व्ह पोहोचवला जातो. मात्र, यात अनेकदा वय व धमन्यांतील ब्लॉकेजची समस्या उद्भवते. यामुळे फक्त ओपन हार्ट सर्जरीचाच पर्याय उरतो. मात्र, अहमदाबादच्या डॉक्टरांनी टीव्हीएआर प्रोसिजरमध्ये थोडा बदल करून व्हॉल्व्ह बदलण्याची नवी व सोपी पद्धत शोधून काढली आहे.

८२ वर्षीय रुग्णास जीवनदान
अहमदाबादच्या सिम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. धीरेंद्र शाह म्हणले, या केसमध्ये ८२ वर्षांच्या रुग्णाचा व्हॉल्व्ह बदलायचा होता. त्याच्या हृदयाच्या सहा आर्टरिजमध्ये ब्लॉकेजेस होते. यामुळे जांघ व खांद्यातून जाणार्‍या मुख्य धमन्यांतून कृत्रिम व्हॉल्व्ह हृदयापर्यंत पोहोचवता आले नसते. रुग्णाची फुप्फुसे-किडनीही कमकुवत असल्याने ओपन हार्ट सर्जरीत जोखीम होती. यामुळे ऑपरेशन करणार्‍या डॉ. मिलन चग व त्यांच्या चमूने प्रोसिजर बदलत रुग्णाच्या छातीवर जेथे हृदयाचा वरील (अयोटा) भाग असतो तेथे दोन सेंटीमीटरचे छिद्र पाडले. याच जागेतून शरीरात रक्तपुरवठा होत असतो. अयोटातून ट्रान्सकॅथेटर टाकून व्हॉल्व्ह हृदयापर्यंत पोहोचवला. मग बलून फुगवून व्हॉल्व्ह बदलला. भारतात २०% ओपन हार्ट सर्जरी फक्त खराब व्हॉल्व्ह बदलण्यासाठीच केल्या जातात, हे विशेष.

ओपन हार्ट सर्जरीविना वरील भागातून व्हॉल्व्ह बदलण्याची ही देशात पहिलीच केस आहे. - डॉ. समीर दाणी, कार्डियोलॉजिस्ट, अपोलो, गांधीनगर

असा व्हॉल्व्ह बदलण्याची पहिलीच केस आहे. ऑपरेशन करणार्‍या चमूचे अभिनंदन - डॉ. अतुल माथुर, कार्डियोलॉजिस्ट, फोर्टिस-एस्कॉर्ट हार्ट इन्स्टिट्यूट, दिल्ली