देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईसह छोट्या भावाचे कुटूंब लवकरच गांधीनगरमधील नव्या बंगल्यात राहाण्यासाठी जाणार आहे. गांधीनगरच्या रायसण भागातील वृंदावन सोसायटीमध्ये मोदींचे धाकटे बंधु पंकजभाई यांनी बंगला खरेदी केला आहे. बंगल्याची वास्तुशांती करण्यात आली असल्याचे शेजारी सांगतात. यामुळे मोदी कुटूंब लवकरच या बंगल्यात राहायला येणार असल्याची चर्चा वृंदावन सोसायटीमध्ये होत आहे.
अनेक वर्षापासून मोदींचा परिवार गांधीनगरच्या सेक्टर-22 या भागात राहात होता. मोदी पतंप्रधान झाल्यामुळे मोदी परिवाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र मोदींची आई हीराबा यांनी सरकारी सुरक्षा नाकारली आहे. यामुळे राज्य सरकार मोदी परिवारच्या सुरक्षेबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते.
मोदींच्या बंगल्याची छायाचित्रे पाहा पुढील स्लाईडवर...