आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात निवडणूक: ‘हम साथ साथ है’पासून ते ‘हम अापके है काैन’पर्यंत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- गुजरातच्या राजकीय इतिहासात १९ नाेव्हेंबरचा दिवस सदैव स्मरणात राहील. रविवारी रात्री उशिरा काँग्रेसने पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादी जाहीर हाेताच गदाराेळ सुरू झाला. दुसऱ्या बाजूला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भरतसिंह साेलंकी अाणि ‘पास’ (पाटीदार अारक्षण अांदाेलन समिती)चे समन्वयक दिनेश बांभणिया यांच्यात अारक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू हाेती. परंतु धाेराजीमधून ‘पास’चे संयाेजक ललित वसाेया अाणि जुनागढमधून अमित ठुम्मर यांच्या नावाची घाेषणा झाली ताेच काँग्रेस अाणि ‘पास’ जणू परस्परांचे हाडवैरी बनले. 


‘पास’ने अचानक कल्लाेळ उठवल्यामुळे विजयासाठी काँग्रेसने जी काही राजकीय समीकरणे अाखली हाेती ती सारी गडबडली अाहेत. पाटीदार, एनसीपी, छाेटू वसावा अादींना साेबत घेऊन भाजपला ९.५ टक्के मतांनी पिछाडीवर टाकण्याचे काँग्रेसचे स्वप्न मात्र या राजकीय गदाराेळात विरले. 
 

पडद्यामागचा खेळ : काँग्रेसची यादी जाहीर काेणी केली? 
गुजरातमध्ये राहुल गांधी यांना मिळत असलेला जनतेचा पाठिंबा पाहून उत्साहित झालेल्या काँग्रेसने हार्दिक पटेल, अल्पेश ठाकाेर अाणि जिग्नेश मेवाणी यांना पुरेसे पाठबळ पुरवले हाेते. दुसऱ्या बाजूला ‘एनसीपी’ने जनतेचा कल भाजपविराेधी असल्याचे सांगत काँग्रेससाेबत अाघाडी करण्याची तयारी सुरू केली हाेती. राजकीय पटावर दिसणारा हा सगळा खेळ दिसत हाेता, मात्र विंगेत भलतेच काही नाट्य सुरू हाेते. २०१९ च्या निवडणूक परीक्षेत काँग्रेस पास हाेईल की नापास हे तर प्रश्नपत्रिका साेपी की कठीण, यावरच अवलंबून हाेते. परंतु ही प्रश्नपत्रिका काेण तयार करत हाेते, याविषयी काँग्रेस अाणि हार्दिक पटेल दाेघेही अनभिज्ञ हाेते. 


अारक्षणाच्या मुद्द्याला विराेध 
‘पास’च्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, ‘पास’ची विश्वासार्हता समाजातून संपुष्टात अाणण्याची काँग्रेसची ही रणनीती अाहे. अारक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसशी अाम्ही सहमत अाहाेत, परंतु याचा अर्थ असा नाही की, अाम्हाला विश्वासात न घेताच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला जावा. अाम्ही अारक्षणासाठी लढत अाहाेत. काँग्रेसची भूमिका तिकिटासाठी हपापलेले अांदाेलनकर्ते ठरवू पाहत अाहे. 


अन‌् भरतसिंह गायब झाले 
‘पास’चे नेते भरतसिंह यांच्या निवासस्थानावरून निघाले अाणि यादी घाेषित झाल्यानंतर उमेदवारांचे नामांकन भरण्यासाठी जिथे मेंडेड लिहिले जात हाेते तिथे पाेहाेचले. वेजलपूरच्या चंचल पार्टी प्लाॅटवर प्रदेशाध्यक्ष भरतसिंह साेलंकी उमेदवारांच्या मेंडेडवर हस्ताक्षर करत हाेते, मात्र त्यांनी एकूणच वातावरणाच्या रंगरूपाचा अंदाज घेऊन दुसऱ्या मार्गाने काढता पाय घेतला. 

 

पुढील स्लाइडवर गुजरात निवडणूकीत जागांवर एक दृष्टिक्षेप... 

बातम्या आणखी आहेत...