आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रभर कारमध्ये फिरवले, गोळी घालण्याचीही धमकी, हार्दिक पटेलचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलच्या गायब होण्याचे गूढ उकलले आहे. बुधवारी दुपारी हार्दिकने आपल्या एका सहकाऱ्याला फोन करून घडलेली हकिगत सांगितली. मला सुरेंद्रनगरमधील ध्रांगध्राच्या महामार्गावर सोडण्यात आले आहे. काही लोकांनी मला अरावलीतील सभेनंतर कारमध्ये बळजबरीने बसवून नेले.

संपूर्ण रात्रभर धमकी देत होते. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर होते. हा शेवटचा इशारा आहे. आंदोलन सोडून न दिल्यास ठार करू, असे अपहरणकर्त्यांनी धमकावले, असे हार्दिकने म्हटले आहे.
हार्दिकला पोलिसांनी पकडलेले नाही. सरकार शांती-व्यवस्थेसाठी काहीही तडजोड करणार नाही, असे गृहमंत्री रजनीकांत पटेल यांनी म्हटले आहे. अद्याप पोलिस हार्दिकपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्याचा शोध घेण्यात येत आहे. म्हणूनच त्याला नजरबंद केल्याचा प्रश्नच उद््भवत नाही. सरकारचे प्रवक्ते नितीन पटेल म्हणाले, हार्दिकला अटक केली जाईल. कोणत्याही व्यक्तीने जनतेचे नुकसान करता कामा नये. कायद्याचे उल्लंघन करू नये. त्याला क्षमा दिली जाणार नाही.