आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसनगर हिंसाप्रकरणीही हार्दिक पटेलला जामीन, राज्याबाहेर राहावे लागणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमध्ये पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू करणारा युवा नेता हार्दिक पटेललला विसनगर हिंसाचार प्रकरणाही गुजरात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राजद्रोहाच्या खटल्यात त्याला याआधीच जामीन मिळाला असल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. विसनगर हिंसाचार प्रकरणात जामीन देताना न्यायालयाने सोमवारी त्याला मंजूर केला आहे. परंतु हार्दिकने यापुढील सहा महिने राज्याबाहेर राहावे, असे आदेशही जारी केले. त्यामुळे हार्दिकला गुजरातबाहेर राहावे लागणार आहे. या काळात तो दिल्लीमध्ये मित्रांसमवेत राहणार असून तेथे राहून तो पटेल समुदायाच्या एकजुटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हार्दिक पटेल गेल्यावर्षी ऑक्टोबर २०१५ मध्ये दोन प्रकरणांत राजद्रोहाच्या आरोपावरून तुरुंगात होता. त्यापैकी एका प्रकरणात हार्दिकला ८ जुलैरोजीच जामीन मंजूर करण्यात आला होता. त्या वेळीही न्यायालयाने सहा महिने राज्याबाहेर राहण्याची अट त्याला घातली होती. परंतु त्यावेळी हार्दिकची तुरुंगातून सुटका होऊ शकली नव्हती. कारण त्याच्यावर महेसाणा जिल्ह्यातील विसनगर शहरातील एका आमदाराच्या कार्यालयात हल्ला व हिंसाचार प्रकरणीही खटला दाखल होता. त्यावरील जामीन अर्ज प्रलंबित होता. सोमवारी हार्दिकच्या वकिलांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केले. त्यात तो कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशा कुठल्याही घटनेत, कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन देण्याचे आदेश दिले. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याची सुटका होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत राहणार मित्रासोबत
जामिनावर सुटल्यानंतर हार्दिक ४८ तास कुटुंबीयांसोबत राहील. त्यांना भेटून तो दिल्लीत त्याचा मित्र अखिलेश कटियारसोबत राहणार आहे. या काळात दिल्ली व हरियाणातील पटेलांना एकजूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. िदल्ली, हरियाणा व राजस्थानच्या जाट समुदायाने त्यासाठी त्याल औपचारिक निमंत्रणही िदले आहे. हार्दिकचे पिता भरत पटेल यांनी सांगितले, आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करतो. राज्याबाहेर राहण्याबाबत ते म्हणाले की, त्याचा निर्णय स्वत: हार्दिकच घेणार आहे.
बातम्या आणखी आहेत...