अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या तीरावर २०१७ चा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव रविवारी सुरू झाला. राज्यपाल ओ. पी. गोयल आणि मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी २८ व्या पतंग महोत्सवाचा शुभारंभ केला. हा महोत्सव ८ ते १४ जानेवारीदरम्यान चालेल. याप्रसंगी अहमदाबादच्या शाळांतील २००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारघातले.अहमदाबादशिवाय पालनपूर, राजकोट, बडोदा आणि गांधीधाममध्येही पतंग महोत्सव सुरू झाला आहे.