आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन साध्वींना वाहनाने उडवले; सेविकेचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - येथील बावळा भागात सोमवारी सकाळी जैन साधू -साध्वींच्या एका संघास अज्ञात वाहनाने उडवले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटली आहे. 
 मध्यप्रदेशातील रतलामजवळील करमदी गावच्या रहिवाशी कलाबाई भील असे तिचे नाव आहे.  कलाबाई ही  संघातील साध्वींची सेविका होती. ती व्हीलचेअर चालवत होती. अपघातग्रस्त  साधू़-साध्वी वल्लभीपूर भावनगर येथून  महेसाणाला चालले होते.
 
साधू-साध्वींच्या संघाने रविवारी रात्री नवकारधाम येथे विश्रांती घेतली. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता बावला-वगोदरा महामार्गावरुन  जात होते. कल्याणगड जवळ या समूहास अज्ञात वाहनाने उडवले. प्रफुल्लप्रभाश्री महाराज यांची व्हीलचेअर चालवणाऱ्या कलाबाईच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 
 
 वाहनाच्या धडकेमुळे साध्वी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळल्या. तर कलाबाई रस्त्यावर पडली. तिच्या डोक्यावरुन वाहनाचे चाक गेले. त्यामुळे जागीच तिचे निधन झाले. इतर साधू व साध्वी मागाहून येत होते. त्यांना या अपघाताची माहिती समजली. दुसरी एक सेविका लक्ष्मीबाई हिने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...