आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालविवाह कायदा मुस्लिमांनाही लागू, पर्सनल लॉपेक्षाही महत्त्व असेल : गुजरात हायकोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- मुस्लिमांनाही बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू असेल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा गुजरात उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. अल्पवयीन मुलींची लग्ने लावणाऱ्या मुस्लिमांवरही बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होईल. या कायद्याला मुस्लिम पर्सनल लॉपेक्षाही अधिक महत्त्व दिले जाईल.

न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीवेळी १८ वर्षांखालील मुस्लिम मुलींची लग्ने लावणाऱ्या किंवा प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध काय कारवाई केली जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित झाला. यामुळे पेच निर्माण झाला, कारण मुलीला १५ वर्षांची झाल्यानंतर मुस्लिम कायद्यानुसार लग्नाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

शेजारच्या १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याचा आरोप युनूस शेखवर (२८) होता. युनूसने गतवर्षी डिसेंबरमध्ये मुलीशी लग्न केले. मुलीच्या वडिलांनी युनूसविरुद्ध गुन्हे दाखल केले. शिवाय बालविवाह प्रतिबंधक कायदाही यात लावला गेला. पर्सनल लाॅ व दंड संहितेतील तरतुदी पाहून न्यायमूर्ती पारडीवाला यांनी अपहरण व अत्याचाराचे आरोप बाजूला सारले. बालविवाहाच्या प्रकरणात कोणी मुस्लिम सामील असल्यास तरतूदींकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
अनेक निकाल पाहून निष्कर्ष
हायकोर्ट, सुप्रीम कोर्टांचे इतर अनेक निकाल आणि अनेक देशांतील कायद्यांचे संदर्भ तपासून न्यायमूर्ती या निष्कर्षाप्रत पोहोचले. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्या लेखाचाही त्यांनी उल्लेख केला. इस्लामविषयक साहित्यातील संदर्भही घेतले.