आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Entry To Muslims In Garba Celebrations In Gujarat

गुजरात: गरबामध्ये प्रवेश मिळवण्याआधी शिंपडले जाईल गोमुत्र, लावला जाईल टिळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मांडवी (गुजरात) - नवरात्र जवळ येत आहे तशी गुजरातमध्ये गरब्याची उत्सूकता वाढली आहे. त्यासोबतच आयोजकांनी गरब्यासाठी येणाऱ्यांसाठी नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे. एका आयोजकाने फर्मान काढले आहे, की गरबासाठी येणाऱ्या प्रत्येक हिंदूला टिळा लावला जाईल आणि गोमुत्र शिंपडून त्यांचे स्वागत केले जाईल. या अटींची पूर्तता करणाऱ्यालाच प्रवेश मिळणार असल्याचे आयोजकाने सांगितले आहे. याचे कारण विचारले तेव्हा, गरबामध्ये मुस्लुमांना सहभागी करुन घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठीच ही अट ठेवली आहे.
सनातन हिंदू समाज नावाच्या संघटनेच्या बॅनरखाली रविवारी गरबा आयोजकांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. गरबा आयोजक रघुवीरसिंह जडेजा म्हणाले, 'मातेच्या उत्सवाचे पावित्र्य कायम राहावे आणि इतर धर्मियांना पायबंद घालण्यास मदत व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.'
गोमुत्र शिंपडल्यानंतर आणि टिळा लावल्यानंतरच प्रवेश
गरबा खेळण्यासाठी आलेल्या प्रत्येक हिंदूच्या अंगावर गोमूत्र शिंपडले जाईल आणि त्यानंतर त्यांच्या भाळी टिळा लावला जाईल. हा विधी झाल्यानतंरच त्यांना आतमध्ये प्रवेश मिळणार आहे. मांडवी हे कच्छमध्ये आहे. येथील लोकसंख्या 50 ते 60 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे येथे बहुतेक लोक चेहऱ्यांने एकमेकांना ओळखतात.
फोटोग्राफीवर बंदी
गरबाचे फोटो घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कॅमेरा किंवा मोबाइलने कोणी फोटो घेताना दिसले तर कॅमेरा किंवा मोबाइल जप्त करुन पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे.