आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात मॉडेल फेल गेले, आता काँग्रेसला सत्तेवर येण्यापासून कोणी रोखू शकत नाही: राहुल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- देशात गुजरात मॉडेल फेल गेले आहे. या मॉडेलचा ना तरुणांना फायदा झाला, ना शेतकऱ्यांना, ना व्यापाऱ्यांना फायदा झाला. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्तेवर येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, असे प्रतिपादन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. येथील साबरमती रिव्हर फ्रंटवर आयोजित कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत होते. या वेळी त्यांनी केंद्र व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.  

२२ वर्षांत गुजरातेत भाजप सत्तेवर आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचा पक्ष निवडणुकीस सामोरे जाण्यास भीत आहे. ही वस्तुस्थिती लपवून ठेवण्याजोगी नाही, असे सांगून राहुल गांधी यांनी नोटाबंदीला सरकारी ड्रामा असे म्हटले. नोटाबंदीमुळे छोटे शेतकरी आणि व्यावसायिकांचे नुकसान झाले.  

नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आणि विकासदरही घटला. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बूथ पातळीपर्यंत जाऊन लोकांना भाजपची  जनताविरोधी धोरणे उघड करावीत. 

लोकांना नोटाबंदीचे दुष्परिणाम, जीएसटी व बेरोजगारांच्या मुद्द्यावर सावध करावे, असे आवाहन केले. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमास संवाद असे म्हटले. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. मात्र, हे प्रश्न त्यांना पूर्वीच पाठवण्यात आलेले होते.
बातम्या आणखी आहेत...