आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NRI ने सुरु केले देशातील पहिले गे मॅरेज ब्यूरो, पार्टनर मिळाल्यास द्यावे लागणार 3 लाख रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा - गुजरातमध्ये एका अनिवासी भारतीयाने (एनआरआय) देशातील पहिला गे मॅरेज ब्यूरो सुरु केला आहे. समलैंगिकांना भारतात आणि विदेशात योग्य जोडीदार शोधून देण्यास ते मदत करतात.

समलैंगिकांना सरोगसीसाठीही केली जाते मदत
- समलैंगिकांसाठी मॅरेज ब्यूरो सुरु करणाऱ्या एनआरआयचे नाव बेनहर सॅमसन आहे.
- 2013 पासून सॅमसन भारतात गे कम्युनिटीच्या लोकांना सरोगसीसाठी मदत करत आहे.
- सॅमसन गुजरातच्या रापीपल येथील गे प्रिन्स मानवेंद्र सिंह गोहिल यांचे कंसल्टंट देखिल आहेत.
- समलैंगिकांना देशाबाहेर लग्न करताना येणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर करण्यासही मदत करण्याचा दावा सॅमसन करतात.
- सॅमसन म्हणाले की पार्टनर मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला पाच हजार डॉलर (3.3 लाख रुपये) फीस द्यावी लागेल.

कोण आहे सॅमसन ?
- अनेक लोक अॅरेंज मॅरेजसाठी भारतात जोडीदार शोधतात, त्यामुळेच भारतात अॅरेंज मॅरेजला सर्वाधिक पसंती दिली जात आहे.
- एवढेच नाही भारतीय लोकांची ओळख आपल्या जोडीदाराबाबत प्रामाणिक असण्यामुळेही आहे. ते आपली जबाबदारी ओळखतात.
- त्यासोबतच भारतात ड्रग्ज घेण्याचे प्रमाणही कमी आहे.
- सॅमसन म्हणाले की ब्यूरोचे काम सुरु होऊन अवघे तीन महिने झाले आहेत.
- आतापर्यंत 250 लोकंनी चौकशी आहे आणि 24 जणांनी नाव नोंदविले आहे. आम्ही या लोकांसाठी योग्य जोडीदार शोधत आहोत.
- सर्वात आधी आम्ही कोणत्याही व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती मिळवतो. त्यात काही महिने जातात. त्यानंतर त्याच्यासाठी पार्टनर शोधण्यास सुरुवात होते.
बातम्या आणखी आहेत...