आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Office Owner Beat Up Gym Owner Over Trivial Issue

VIDEO: ऑफिस रिकामे न केल्याने पाच जणांनी जीम मालकाला बेदम मारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट (गुजरात)- जीमच्या मालकाला बेदम मारहाण करीत हात-पाय तोडणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांना अटक केली आहे. इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. ऑफिस रिकामे न केल्याने या पाच जणांनी जीमच्या मालकाला बेदम मारहाण केली होती. काठ्यांनी मारुन मारुन त्याचे दोन्ही पाय तोडले होते. ही घटना ऑफिसमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे. यातून या पाच जणांचे कौर्य जगासमोर आले आहे.
भास्कर चेतनभाई असाणी असे जीम मालकाचे नाव आहे. मुळचे जुनागड येथील असलेले भास्कर राजकोटमधील याज्ञित रोडवरील मीर कॉम्प्लेक्समध्ये जीम चालवतात. प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये भाडे ते ऑफिसचे मालक मनीषभाई ओझा यांना देतात. परंतु, काही दिवसांपूर्वी मनीषभाई यांनी हे ऑफिस जितेंद्रसिंह चूडासमा यांना विकले होते. त्यामुळे भास्करला ऑफिस रिकामे करण्यास सांगितले होते. यावर भास्कर यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे चिडलेल्या चूडासमा यांनी चार सहकाऱ्यांसह त्यांना बेदम मारहाण केली.
पुढील स्लाईडवर व्हिडिओत बघा, पाच जणांनी भास्कर यांनी कशी केली मारहाण....