आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी केला मनसुख यांचा उल्लेख, म्हणाले-अभिनंदन त्यांनी मनमोहन यांना सत्य सांगितले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (गुरुवारी) सभेहून परतताना त्यांना एका ज्येष्ठ व्यक्तीने आवाज दिला आणि प्रश्न विचारल्याने ते संभ्रमात पडल्याचे पाहायला मिळाले. या ज्येष्ठ व्यक्तीने त्यांना यूपीए सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांवर प्रश्न केला होता. तुमच्या सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांबाबत काहीच का बोलत नाही, असे या ज्येष्ठ व्यक्तीने मनमोहन सिंग यांना विचारले. यावर मनमोहन यांनी त्या व्यक्तीला फक्त हात जोडले. मनमोहन सिंग यांनी भाजपचे सरकार (राज्य आणि केंद्र) वर जोरदार हल्ला चढवला. तसेच जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयावरूनही टीका केली. दरम्यान, नरेंद्र मोदींनी बनासकांठा येथील सभेत याचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, मनसुख काकांचे अभिनंदन. त्यांनी मनमोहन यांना सत्य सांगितले.


नेमके काय घडले...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राजकौट दौऱ्यावर होते. सभेहून परतत असताना ज्येष्ठ अशा मनसुखभाई यांनी त्यांना आवाज दिला. त्यावर मनमोहन सिंग थांबले तेव्हा एक पुस्तक दाखवत त्यांनी मनमोहन यांना म्हटले की तुमच्या राज्याच कोट्यवधींचे घोटाळे झाले, तुम्ही त्यावर काहीही का बोलले नाही. त्यावर मनमोहन यांनी केवळ हात जोडले.


मनमोहन यांचा भाजपवर हल्लाबोल.. 
आर्थिक धोरणांवर टीका :
  मनमोहन सिंग यांनी राजकोटमध्ये मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली हाेती. विशेषतः नोटबंदी आणि जीएसटी चुकीचे निर्णय असल्याचे म्हटले. मोदींवर गुजराती जनतेचा जो विश्वास आहे, तो मोदींनी तोडला. त्यांच्या नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यामागे देशाला फायदा व्हावा असा जनतेचा उद्देश होता. पण तसे झाले नाही. त्यांच्या विश्वासाला तडा गेला. ९९% जुन्या नोटा बँकांत आल्या आणि सर्व काळा पैसा पांढरा झाला. त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा फटका बसला.


मोदींनी भ्रष्टाचारावर कारवाई करावी 
मनमोहन म्हणाले, यूपीए सरकारमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत होती. जर मोदी भ्रष्टाचाऱ्यांची लगाम आवळत असल्याचा दावा करतात तर शहांच्या मुलाच्या कंपनीवर लागलेल्या आरोपांसह इतर आरोपांची चौकशी करावी.


राम मंदिरावर मौन
मनमोहन सिंग यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना फक्त एवढे म्हटले की, हा मुद्दा न्यायालयात  असल्याने मला त्यावर काहीही बोलायचे नाही. न्यायालय याबाबत जो निर्णय घेईल तो मान्य असेल.


मनमोहन यांचा भाजपवर हल्लाबोल.. 
1) आर्थिक धोरणांवर टीका.. 

- मनमोहन सिंग यांनी राजकोटमध्ये मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली. विशेषतः नोटबंदी आणि जीएसटी चुकीचे निर्णय असल्याचे म्हटले. 
- मोदींवर गुजराती जनतेचा जो विश्वास आहे, तो मोदींनी तोडला. त्यांच्या नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यामागे देशाला फायदा व्हावा असा जनतेचा उद्देश होता. पण तसे झाले नाही. त्यांच्या विश्वासाला तडा गेला. 99% जुन्या नोटा बँकांत आल्या आणि सर्व काळा पैसा पांढरा झाला. 
- त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा फटका बसला. 


2) मोदींनी भ्रष्टाचारावर कारवाई करावी 
मनमोहन म्हणाले, युपीए सरकारमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत होती. जर मोदी भ्रष्टाचाऱ्यांची लगाम आवळत असल्याचा दावा करतात तर शहांच्या मुलाच्या कंपनीवर लागलेल्या आरोपांसह इतर आरोपांची चौकशी करावी. 


3) राम मंदिरावर मौन 
मनमोहन सिंग यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना फक्त एवढे म्हटले की, हा मुद्दा कोर्टात असल्याने त्यावर बोलायचे नाही. कोर्ट जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 


4) नर्मदा प्रोजेक्टसाठी कधीही भेटले नाही 
- सिंग म्हणाले, मला आठवते त्यानुसार नर्मदा प्रोजेक्टबाबत मोदी मी पंतप्रधान असताना मला कधीही भेटले नाहीत. 

 

बातम्या आणखी आहेत...