आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक कोटीच्या लँड क्रुझरची गाढवगाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - तब्बल एक कोटी रुपयांची लँड क्रुझर ही आलिशान कार घेऊनही चांगली सर्व्हिस मिळत नसल्याने वैतागलेले बिल्डर तुषार घेलानी यांनी आगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. त्यांनी शनिवारी जॉगिंग ट्रॅकवर या कारला चक्क गाढवे जुंपली. विकत घेतल्यापासूनच कार नेहमी बिघडत असे. शाेरूमवालेही चांगली सर्व्हिस देत नव्हते. किरकोळ कामासाठी तीन दिवसांपर्यंत कार ठेवली जात असे. यामुळे कार कंपनी व डीलरची जिरवण्यासाठी तुषार यांनी कारला गाढवे जंुपून ती फिरवली.